आयुर्वेद सर्वांसाठी – ३ पुस्तकांचा संच (Ayurveda Sarvansathi) – वैद्य प. य. वैद्य खडीवाले
Original price was: ₹ 500.00.₹ 450.00Current price is: ₹ 450.00.
🚚 संपूर्ण भारतात कुरिअर सुविधा
- सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
- सुरक्षित पॅकिंग व जलद पाठवणी
- १००% मूळ प्रकाशनांची हमी
Description
वैद्य परशुराम यशवंत खडीवाले हे ज्येष्ठ आयुर्वेद संशोधक, लेखक आणि आरोग्यसेवक आहेत. आयुर्वेदाचे संशोधन आणि त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी १९७४ साली ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन’ संस्थेची स्थापना केली. तसेच ‘हरी परशुराम औषधालय’ आणि ‘आयुर्वेदिक औषध भांडार’ सुरू केले. आयुर्वेदाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे १५० हून अधिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत.
१९८२ साली ‘जनकल्याण रक्तपेढी’ आणि १९८८ साली ‘जनकल्याण नेत्रपेढी’ सुरू करून त्यांनी समाजसेवेत योगदान दिले. बीड जिल्ह्यात पाच वर्षे मोफत आयुर्वेद चिकित्सालयाद्वारे आरोग्यसेवाही केली.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून २००९ साली ‘शताब्दी महर्षी’, २०१५ साली ‘आयुर्वेद भूषण’ आणि २०१६ साली ‘राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली.






Reviews
There are no reviews yet.